अहमदनगर लाईव्ह 24 टीम / वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सलग दुसरा आणि मालिकेतील चौथा टी 20 सामनाही चित्त थरारक झाला. हा सामनाही टाय झाल्याने सुपर ओव्हरमध्ये या सामन्याचा निकाल लागला. भारताने या सामन्यातही सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला
Another win in the Super Over 🙌🙌 #TeamIndia go 4-0 up in the series. 🇮🇳🇮🇳 #NZvIND pic.twitter.com/G6GqM67RIv
— BCCI (@BCCI) January 31, 2020
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 8 गडी गमावून 165 धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य दिले. मात्र हे आव्हानही पार करण्यात न्यूझीलंडला अपयश आलं. न्यूझीलंडने 20 षटकात 7 बाद 165 धावा केल्या. त्यामुळे सलग दुसरा टी 20 सामनाही टाय झाला.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 13 धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी भारताला 14 धावांची गरज होती. भारताकडून के एल राहुल आणि कर्णधार विराट कोहली मैदानात उतरले. राहुलने पहिल्याच चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.
मग स्ट्राईकवर असलेल्या विराटने चौथ्या चेंडूवर दोन धावा आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारुन विजय मिळवला.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com