अहमदनगर लाईव्ह 24 टीम / वेलिंग्टन : देशभरात आज 71 वा प्रजासत्ताक दिवस साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनी टीम इंडिया ने 7 विकेट राखुन दणदणीत विजय मिळवत चाहत्यांना विजयाचं गिफ्ट दिल.
Clinical performance by #TeamIndia to take a 2-0 lead in the series 🔥🙌 #NZvIND pic.twitter.com/kYNGckrhjz
— BCCI (@BCCI) January 26, 2020
न्यूजीलँडविरोधात सुरू असलेल्या पाच टी-20 सीरीजमधील दुसऱ्या सामन्यात भारताने 7 विकेट राखुन दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलँडने भारताला 133 रनाचे टार्गेट दिले होते, भारताने फक्त 17.3 ओव्हर्समध्येच हे लक्ष पूर्ण केले.
रविवारी ऑकलँडच्या ईडन पार्कमध्ये न्यूजीलँडने टॉस जिकुंन फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 132 रनाचे लक्ष भारताला दिले होते.
हे लक्ष पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताने 17.3 ओव्हरमध्येच हे लक्ष पूर्ण केले. भारताकडू राहुलने अर्धशतकी खेळी केली तर श्रेयस अय्यरने 44 रनाची खेळी केली.
ओपनींगला आलेल्या रोहित शर्माने 6 चेंडूत फक्त 8 रन काढले, तर कर्णधार विराट कोहली 11 रनावर आउट झाला.