भाजपच्या तालुकाध्यक्षपदावरून पारनेर भाजपमध्ये अंतर्गत वाद

Ahmednagarlive24
Published:
जिल्ह्यातील काही नेत्यांनी पारनेरचे तालुकाध्यक्षपद वसंत चेडे यांना देऊन सच्चा कार्यकर्त्यांवर अन्याय केला. शिष्टमंडळ लवकरच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कुणीही चालेल, चेडे नको अशी भूमिका मांडणार असल्याची माहिती भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी दिली.
कोरडे यांच्या निवासस्थानी रविवारी भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, तालुका सरचिटणीस डॉ. अजित लंके, जिल्हा सांस्कृतिक सेल उपाध्यक्ष विलास हारदे, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मनोहर राऊत, सुनील थोरात, सागर मैड, तुषार पवार, काशीनाथ नवले, अशोक पवार, प्रवीण भन्साळी आदी या वेळी उपस्थित होते.
कोरडे म्हणाले, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांना हटवण्यात आले. चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल, तर कुठपर्यंत सहन करायचे. पक्षावर आमची श्रद्धा आहे व शेवटपर्यंत राहाणार आहे. मात्र, भाजपविरोधी पक्षांशी सतत समन्वय असणाऱ्यांना तुम्ही तालुकाध्यक्षपद देऊन भाजप संपवण्याचे काम करत आहात. तालुकाध्यक्षपदी चेडे हे कुणालाही मान्य नाही. 
त्यासाठी लवकरच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन जाणार असल्याची माहिती कोरडे यांनी दिली. पक्षसंघटना मजबूत करून काेरडे यांनी लोकांची कामे करून जनसंपर्क वाढवला आहे याचाच फायदा पक्षाला झाला आहे. चेडे यांनी पक्षात राहून विरोधकांना सातत्याने पाठिंबा दिला. अशाप्रकारे चेडे पक्ष संपवतील, अशी भावना बहुसंख्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment