अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शहरात सर्वत्र बंद असताना शहरातील एका हॉटेलमध्ये इराणी नागरिकाने स्वतः बाबत माहिती लपवून वास्तव्य केले. व तेथून निघून गेल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत इराणी नागरिकाविषयी माहिती शासकीय यंत्रणेपासून लपवून ठेवल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात हॉटेल मालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हॉटेल सिंग रेसिडेन्सीचे मालक कंवलजीत सिंग गंभीर ( वय- 47रा.नगर), मॅनेजर रुपेश सोहनलाल गुलाटी (वय- 23 रा. तारकपुर नगर), ईराज हुसैन रेझई (वय- 48 रा. तेहरान इराण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी पहाटे तीन वाजता तारकपूर येथील सिंग रेसिडेन्सी हॉटेलमध्ये एक इराणी व्यक्तीने भारतीय असल्याचे सांगून वास्तव केले. व सकाळी तेथून पसार झाला.
परदेशी नागरिकाबाबत हॉटेल मालकांकडून करोना विषाणू रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास कळवणे बंधनकारक असताना प्रशासनास कळविले नाही.
आरोपीच्या कृतीमुळे जीवितास धोकादायक असलेल्या करोना रोगाचा संसर्ग होणे संभव असून ते त्यांना स्वतःला माहित असताना सुद्धा त्यांनी इराणी नागरिकाविषयी माहिती लपवून ठेवली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com