अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : जावयाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने निघोजकरांना दिलासा मिळाला. मूळचा पारनेर येथील, मात्र मुंबईत स्थायिक असलेल्या निघोज येथील जावयाला श्वसनाचा त्रास झाल्याने शनिवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
घशातील स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. रविवारी रात्री अहवाल निगेटिव्ह आला. ही व्यक्ती ३० मे रोजी मुंबईहून पत्नी मुलगी व मुलासह निघोजला सासुरवाडीत आली होता.
संस्थात्मक विलगीकरणाऐवजी स्वतंत्र बंगल्यात जावयाचे कुटुंब ठेवण्यात आले होते. काही दिवसांपासून जावयास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेला ही माहिती देण्यात आली.
आरोग्य विभागाने शनिवारी सायंकाळी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. कोरोनासदृश लक्षणे आढळल्यामुळे घशातील स्राव तपासणीसाठी घेण्यात आले.
गेले ऐंशी दिवस निघोज व परिसर लॉकडाऊन आहे. तथापि, मास्क व सॅनिटायझरचा वापर न करता अनेक जण फिरत आहेत. त्यात मुंबईहून आलेल्यांची संख्या मोठी असल्याने ग्रामस्थ विशेष काळजी घेत आहेत.
यापूर्वी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, त्याच्या संपर्कातील ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आठ-दहा दिवसांपूर्वी एका वृद्धाला किरकोळ त्रास सुरु झाल्याने आरोग्य विभागाने तपासणीसाठी नगरला नेले.
मात्र, कोरोनासदृश कोणतीही लक्षणे न आढळल्याने स्राव तपासणी न करता परत पाठवले. त्या वृद्धाची तब्येत ठणठणीत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews