अहमदनगर : जामखेडमध्ये अजब प्रकार घडला. चक्क आरोपीने विवाहीत महिलेला लग्न करण्याचा आग्रह धरला. नवऱ्याला सोडून दे अन् माझ्याशी लग्न कर अशी अजब मागणी करत आरोपीने त्या महिलेच्या पती व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी मायकल शेळके (रा. लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) याच्या विरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात १६ जुलैला गुन्हा दाखल झाला आहे.
२५ जुन २०१९ रोजी फिर्यादी या त्यांच्या घरी असताना तेथे मायकल शेळके हा आरोपी आला. तु तुझ्या नवऱ्याला सोडून दे व माझ्याशी लग्न कर असे म्हणत आरोपीने शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच मारहाणही केली.
फिर्यादीच्या पती व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली. आरोपीने फिर्यादीच्या घरातील आधार कार्ड, शाळेचा दाखला व इतर कागदपत्रे घेऊन पोबारा केला.
हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला सोडणार नाही. तुझा काटा काढीन अशा प्रकारची धमकीही आरोपीने दिली.
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग
- धरणातील गाळ काढण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण करा- विखे पाटील
- महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी सरकारची नवीन नियमावली जाहीर !