गळफास घेऊन शिक्षिकेची आत्महत्या

Published on -

जामखेड :- येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील शिक्षिका विजया नितीन वराट (वय ४०, माहेरचे नाव विजया सीताराम गुजर) यांनी बुधवारी मध्यरात्री तपनेश्वर भागातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेमुळे शिक्षण विभागात व परिसरात खळबळ उडाली. अंत्यविधी गुरूवारी सकाळी झाला. त्यांच्यामागे पती, मुलगी, मुलगा, सासू-सासरे, आई-वडील,भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

विजया वराट या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाच वर्षांपासून शिक्षिका म्हणून काम पहात होत्या. विजया यांचे पती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. सध्या शाळांना सुटी असल्याने विजया घरीच होत्या.

बुधवारी रात्री साडेअकराच्या पुढे त्या झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या. यावेळी घरातील मंडळी हॉलमध्ये बसली होती. त्यांचे पती नितीन शिवाजी वराट हे कामानिमित्त बाहेर गेले होते. विजया यांनी बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe