पंचायत समितीच्या गाडीखाली चेंगरून चिमुकलीचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

जामखेड :- पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती करणाऱ्या गाडीखाली चेंगरून पाच वर्षांच्या अनुजा गणेश कोल्हे (राजुरी) या चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला.

या घटनेने राजुरी परिसरात शोककळा पसरली. राजुरी हे गाव शिर्डी-हैदराबाद महामार्गावर जामखेडपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे.

अनुजा ही रविवारी दुपारी चार वाजता कोल्हेवस्तीवर रस्ता ओलांडत असताना तालुका पंचायत समितीची हातपंप दुरुस्तीची गाडी जामखेडकडे येत असताना ही चिमुरडी चेंगरली गेली.

या घटनेमुळे चालक घाबरून पळून गेला. अनुजाला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण उपयोग झाला नाही. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment