पाथर्डी – मित्रासोबत त्याच्या बहिणीच्या लग्न पत्रिका वाटणाऱ्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे
लग्नपत्रिका वाटून परत गावाकडे येत असतांना माणिकदौंडीहून पाथर्डीकडे भरघाव वेगात जाणाऱ्या बोलेरो गाडीने धडक दिली.

तालुक्यातील केळवंडी फाट्यावर झालेल्या या अपघातात सुट्टीवर आलेला जवान दादासाहेब लक्ष्मण आठरे (रा.केळवंडी,ता.पाथर्डी)याचा अपघातात मृत्यू झाला तर त्याचा मित्र ऋषिकेश विक्रम शेटे हा जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,भारतीय सैन्यात असणारे दादासाहेब लक्ष्मण आठरे(रा.केळवंडी)हे सुट्टीनिमित्त गावाकडे आले होते.
यावेळी त्यांचे मित्र ऋषिकेश शेटे यांच्या बहिणीच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी गाडी न.एम.एच.१२,एल वाय-८५८७ या दुचाकीवर पाथर्डी येथे आले होते.
त्यानंतर पत्रिका वाटून परत गावाकडे जात असतांना केळवंडी फाट्यावर माणिकदौंडीहून पाथर्डी कडे जाणाऱ्या बोलेरो गाडीने आठरे यांच्या गाडीला जोराची धडक दिली.
या धडकेत दादासाहेब आठरे व ऋषिकेश शेटे या दोघांना जोराचा मार लागला.यावेळी उपस्थित नागरिकांनी दोघांनाही पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र दादासाहेब आठरे हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.तर जखमी ऋषिकेश शेटे याला पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी दवाखान्यात हलवले आहे.
याबाबत मयत दादासाहेब आठरे यांचे भाऊ नानासाहेब आठरे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात एम.एच.१६,एटी-४०५७ या काळ्या रंगाच्या बोलेरो गाडी चालकाविरुद्ध फिर्याद दिली असून पाथर्डी पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- Investment Tricks: GST कपातीमुळे तुमचे महिन्याला 1000 वाचले तर कुठे गुंतवाल? मिळू शकतील 2 लाख 32 हजार…
- Tata Car: टाटाच्या कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी! होतील 1.55 लाखापर्यंत स्वस्त…कधी लागू होतील नवीन किमती?
- एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि 1 लाख रुपये पेन्शन मिळवा! एका क्लिकवर वाचा संपूर्ण माहिती
- GST On Gold: 1 लाखाचे सोने खरेदी कराल तर किती द्यावा लागणार जीएसटी? बघा फायद्याची माहिती
- Onion Rate: आता सरकारच्या माध्यमातून ग्राहकांना मिळेल 5 ते 10 रुपयांनी स्वस्त कांदा! कसे ते वाचा?