राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगर जिल्हा दौऱ्यावर.

Published on -

अहमदनगर :- आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष पाटील हे मंगळवारी दि. २२ दुपारी चार वाजता नगरमध्ये येणार असून , त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन,अहमदनगर येथे अहमदनगर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या असतील,असे पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्षे यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe