अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे.
राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली असून नागरिक चिंतेमध्ये असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यासंदर्भात दिल्लीत सरंक्षणमंत्री आणि लष्कर प्रमुख यांच्यासोबत चर्चा केली असून त्याचा तपशील माजी आ. शिवाजीराव कर्डिले आणि मी बाधित तालुक्यातील शेतकर्यांशी संवाद साधून त्यांना देणार असल्याचे खा.डॉ. विखे यांनी सांगितले.
के. के. रेंजसाठी भूसंपादन झाल्यानंतर आवश्यकतेनुसार अतिरिक्त जमिनीला रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. 40 वर्षांपासून रेड झोन असताना लष्कर अतिरिक्त जमीन संपादन करणार ?,
अतिरिक्त जमिनीची आवश्यकता आहे ? आणि यापूर्वी जाहीर झालेल्या रेड झोनबाबत काय भूमिका आहे. याबाबत मी संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांची विस्तृत चर्चा केली.
तसेच काही तांत्रिक गोष्टींबाबत लष्कर प्रमुख मेजर जनरल नरवणे यांना भेटून सुद्धा त्यांना याबाबत अवगत करण्यात आले आहे.
जोपर्यंत राज्य सरकार याबाबत ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत लष्करी कवायती व सर्वेक्षण थांबवावे, अशी विनंती सुद्धा केली असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved