नगरसेवक कैलास गिरवले मृत्यू प्रकरणाशी संबंधित पोलिसांना प्रतिवादी सदर करण्याचे खंडपीठाचे आदेश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर – पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांना त्यांच्या माळीवाड्यातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली होती. कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता.

यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित पोलिसांना प्रतिवादी करावे तसेच सीआयडीने तपासाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आहेत.

पोलिसांच्या मारहाणीतच कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला असून संबंधित पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी असलेली याचिका त्यांच्या पत्नी निर्मला गिरवले यांनी दाखल केली होती.

गिरवले यांना मारहाण प्रकरणात ज्या पोलिसांचा संबंध असेल त्यांना प्रतिवादी करण्यास न्यायालयाने परवानगी दिल्याने पोलीस अडचणीत येण्यासी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment