राहुरी : आमदार शिवाजी कर्डिले व नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या अर्जावरील हरकत फेटाळत त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. छाननीत अन्य दोन उमेदवारांचे तीन अर्ज बाद झाल्याने ११ उमेदवारांचे १५ उमेदवारी अर्ज राहुरीत वैध ठरले. सोमवारी माघारीच्या दिवशी विधानसभा निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
छाननीला शनिवारी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयात सुरुवात झाली. यमनाजी आघाव यांचा १ उमेदवारी अर्ज, विजय मकासरे यांचे २ अर्ज बाद झाले. भाजपचे उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्याबाबत हरकत घेणारे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांच्याकडे आल्याने सायंकाळपर्यंत या अर्जांवर कामकाज सुरू होते.

अॅड. भाऊसाहेब पवार यांनी घेतलेल्या हरकतीत म्हटले आहे, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना २१ मार्च २०१९ रोजी राहुरी पोलिस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार कर्डिले व नगराध्यक्ष तनपुरे यांनी सहभाग नोंदवून आचारसंहितेचा भंग केला होता.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या दोघांचे उमेदवारी अर्ज बाद करावेत. सायंकाळी साडेपाच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी कर्डिले व तनपुरे यांच्याविरुध्दची हरकत फेटाळत दोन्ही अर्ज वैध ठरवले.
- 84 वर्षांची ‘ही’ जुनी कंपनी एका शेअरवर 3 Bonus Share देणार ! रेकॉर्ड डेट कोणती? पहा…
- सॅमसंगचा 5G स्मार्टफोन फक्त 9 हजारात ! ‘या’ ठिकाणी मिळतोय बंपर डिस्काउंट
- मोटोरोलाचा फ्लिप फोन आता तुमच्या बजेटमध्ये! Motorola Razr 60 वर मिळतोय 15,000 रुपयांचा डिस्काउंट
- Mahindra XUV 3XO खरेदीसाठी 200000 डाऊन पेमेंट केल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार?
- Tata Motors चा मोठा धमाका ! नव्यानेच लॉन्च झालेल्या SUV च्या किमतीत 1.80 लाखांची कपात, वाचा डिटेल्स