राशीन : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असलेला टेम्पो कर्जत तालुक्यातील राशीन येथे पोलीसांनी पकडला. यामध्ये गोंवशीय 10 वासरे, एक जरसी गाय व आयसर टेम्पो असा दहा लाख अकरा हजार रूपयांचा मुद्देमाल पकडला.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, राशीन येथे कत्तलीसाठी जनावरे जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राशीन येथील पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांनी हा टेम्पो मुद्देमालासहित पकडला.
याबाबत पोलीस कॉ. गणेश ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो क्रमांक एम.एच.42 पी. 1052 ताब्यात घेतला असून चालक मनोज ज्ञानदेव साळवे राशीन व टेम्पो मालकाविरूद्द गुन्हा दाखल केला आहे.
सदर आरोपीला कर्जत येथील न्यायालयात हजर केले असता, तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस कॉ. गणेश ठोंबरे, मारूती काळे आदी सहभागी झाले होते.