कोपरगाव :- बसस्थानकात उभ्या असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्याने लांबवले.
ही घटना शनिवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास घडली. मुंबई-घाटकोपर येथून आलेल्या वैशाली शांताराम हिरे (६० रा.घाटकोपर) या कोपरगाव बसस्थानकावर शिर्डी येथे जाण्यासाठी उभ्या होत्या.

File Photo
यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले. मंगळसूत्र चोरल्यानंतर महिलेने आरडाओरडा केला पंरतु तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.