कोपरगाव :- पाण्याच्या बाटलीचे असलेली उधारी मागितल्याचा राग आल्याने नगरसेवकासह तिघांनी साईआस हे मेडिकल दुकान फेटवून दिल्याची घटना १४ फेब्रुवारी रोत्री रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान टाकळी रोडवर घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी : टाकळी रोडवर सचिन निबा शिरोडे यांचे साईआस नावाने मेडिकल आहे. १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते १० च्या सुमारास या दुकानावर नगरसेवक संदीप पगारे व आणखी दोघे आले. शिरोडे यांनी त्यांच्याकडे पाण्याच्या बाटलीची असलेली उधारीची मागणी केली.
याचा राग आल्याने माझी दहा रुपयाची किमत करतो का? मी नगरसेवक आहे. तू कोणाकडे पैसे मागतो समजते का? तुम्ही आमचे जीवावरच मोठे झालात. तुमचे दुकान जाळून टाकीन. तुम्ही सकाळी दुकान उघडले, तर तुमच्या दुकानासमोर येवून तमाशा करीन. तुमच्या नावे गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिली.
त्यानंतर शिरोडे मेडिकल दुकानला कुलूप लावून भावाच्या मेडिकलवर गेले. यावेळी आरोपींनी फिर्यादीचे मेडिकलला कशाच्या तरी सहाय्याने मेडिकलला आग लावली. याप्रकरणी सचिन शिरोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरसेवक संदीप सावळेराम पगारे, संदीप एकनाथ पगारे व आणखी एक अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.