अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यासह शहरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन केले.
त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांचे हातातील काम गेल्यामुळे अनेकजण आर्थिक संकटात सापडला असल्यामुळे त्याला अन्नधान्य व किराणाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळत चालल्यामुळे रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा मिळत नव्हती.
यासाठी पहिले गुरुआनंद कोविड सेंटरच्या माध्यमातून आयुर्वेद कॉलेज येथे सेंटर सुरु केले. कोविडचा काळ सर्वांसाठी कठीण आहे. रुग्णांचे व नातेवाईकांचे दिवसभर फोनच्या माध्यमातून अँडमिट व मेडिसीनचे प्रश्न सोडविले. तसेच सुमारे ५ ते ७ हजार कोरोना रुग्णांना भेटलो. मी काही डॉक्टर नाही, परंतु त्यांची विचारपूस करुन त्यांना मानसिक आधार दिला.
या सेंटरच्या माध्यमातून आयुर्वेद कॉलेज येथील डॉक्टर, नर्स व कामगार यांनी मोठे योगदान दिल्याबद्दल त्यांचा गौरव करणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. गुरुआनंद कोविड सेंटरच्यावतीने आयुर्वेद कॉलेज येथील डॉक्टर, नर्स व कामगार यांच्या योगदानाबद्दल सन्मान करताना आ. संग्राम जगताप.
समवेत आयुर्वेद कॉलेजचे उपाध्यक्ष डॉ. विजय भंडारी, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक विपुल शेटीया, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी, अमित मुथा, धनेश कोठारी, सुमित लोढा, वैभव मेहेर, तुषार चोरडिया, विपुल वाखुरे, रोशन चोरडिया, रितेश पारख, डॉ. अंजली देशमुख, डॉ. समीर होळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कमलेश भंडारी म्हणाले की, जिल्ह्यातील पहिले कोविड सेंटर आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सुरु केले. आयुर्वेद कॉलेज व बडीसाजन मंगल कार्यालय येथील कोविड सेंटरमधून सुमारे १ हजार रुग्ण बरे होऊन आनंदाने घरी पोहोचले. सामाजिक भावनेतून गुरुआनंद कोविड सेंटरला विविध संस्थांनी व संघटनेने मदत केली.
डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांमुळेच आपण चांगले काम करु शकलो, असे ते म्हणाले. यावेळी अमित मुथा म्हणाले की, कोरोना रुग्णांना कठीण परिस्थितीत चांगली सेवा देण्याचे काम आम्हाला करता आले. तसेच शहरातील नागरिकांना अल्पदरात कोरोनाची स्त्रव चाचणी करण्याचा उपक्रमही सुरु केल्यानंतर यामध्ये नागरिकांना दिलासा मिळाला.
भीतीच्या वातावरणामध्ये कोरोना सेंटर सुरु करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. खासगी हॉस्पिटललाही अँडमिट करुन घेतले जात नव्हते. शहरात फक्त बुथ हॉस्पिटल हे एकमेव कोविड सेंटर होते. अनेक रुग्णांना जागा मिळत नव्हती.
यासाठी आ. संग्राम जगताप यांच्या आत्मविश्वासामुळे आमची कोरोनाबाबतची भीती गेली व आम्ही शहरात दोन कोविड सेंटर सुरु केले असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समीर होळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन धनेश कोठारी यांनी केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved