शेवगाव : मुळा धरणाच्या पाटपाण्यावर शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्क असून, जोपर्यत टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. तो पर्यत मुळा पाटपाणी आंदोलन तीव्र करणार आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीलाच मुळा विभागात आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर त्यासारखे तालुक्याचे दुर्दैव नाही.असे मत शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले यांनी व्यक्त केले..
ढोरजळगाव येथे सोमवारी होणाऱ्या मुळा धरणाचे पाटपाणी नियोजनसाठी आयोजित लाभार्थी गावातील शेतकरी बैठकीप्रसंगी घुले बोलत होते. यावेळी संजय कोळगे,अनिल मडके,आंबादास कळमकर, बबनराव भुसारी, भाऊसाहेब चेके, उत्तमराव आहेर, भरत वांढेकर, अँड जमधडे भाऊसाहेब, राजेश फटांगरे, बाळासाहेब जाधव, विजय पोटफोडे, रघुवीर उगले, चंद्रकांत निकम साहेबराव आंधळे, राजेंद्र देशमुख, सुधाकर लांडे, भाऊसाहेब अरगडे, राजेंद्र वाणी ,आदिनाथ कराड, सुभाष वाणी, सुधाकर चोथे, वसंतदेवा भालेराव, अजय नजन चितंरजन घुमरे, शाहादेव खोसे, आदिसह शेतकरी उपस्थित होते..

घुले म्हणाले की सध्या पाण्यातही राजकारण केले जात असून, सद्यस्थितीत दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन महिने झाले पाऊस नसल्यामुळे पिके जळुन चालली आहेत. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आसतानाही ओव्हरफ्लोचे पाणी सोडुनही शेवगाव तालुक्याला जाणीवपूर्वक डावलले. पाटपाण्यावर या भागातील शेतकऱ्यांचा हक्क असताना लोकप्रतिनिधीच कार्यकारी अभियंत्याला निवेदन देण्याची भुमिका घेत असतील तर लाभार्थी शेतकऱ्यांना पाटपाणी कधी मिळणार.
ही मोठी मुश्कील बाब आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी इच्छाशक्ती लागते. दोन दिवसात या परिसरातील लाभार्थी गावातील शेतकऱ्यांना पाणी देवून गावतळी, शेततळी ,बधारे भरून न घेतल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला..