राहुरीत कोरोना किटचा तुटवडा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असतानाच राहुरी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शासनाच्या कोवीड केअर सेंटरमध्ये कोरोनाची तपासणी थंडावली आहे.

मागील तीन दिवसापासून रोज तीस किट उपलब्ध होत असल्याने, गरजूंना नगर येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी जावे लागत आहे. कोरोना तपासणी होत नसल्याने, गरीब रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार मिळत नाहीत.

त्यामुळे रुग्णांची हेळसांड सुरू झाली आहे राहुरी कृषी विद्यापीठ येथील कोवीड केअर सेंटरमध्ये रोज 150 ते 200 जणांच्या रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या केल्या जात होत्या.

ॲन्टीजेन चाचण्यांच्या किट संपल्याने, आठ दिवसांपासून घशातील स्वॅब घेऊन, तपासणी केली जात होती. परंतु, मागील तीन दिवसांपासून रोज फक्त तीस जणांची स्वॅब तपासणी केली जात आहे.

दरम्यान; खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या अनेक रुंगांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीसाठी पुन्हा खासगी प्रयोगशाळेत मोठा खर्च करावा लागत आहे.

कोरोनाच्या संकटमय काळात खाजगी हॉस्पिटलकडून देखील रुग्णांची पिळवणूक होत आहे. एखादा रुग्ण खासगी दवाखान्यात गेला असता त्यास थंडी, ताप, खोकला असल्यास खाजगी वैद्यकीय व्यावसायिक कोरोनाची तपासणी करण्यास सांगत आहेत.

त्यामुळे कोरोना तपासणी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाची मोफत तपासणी सेवा थंडावल्याने, रुग्णांची ससेहोलपट सुरू आहे. कोरोना तपासणी वाढविण्यासाठी रोज शंभर किटची मागणी केली आहे.

ॲन्टीजेन चाचण्यांच्या किट संपल्या आहेत. नगर येथे जिल्हा रुग्णालयात कोरोना किटचा तुटवडा आहे. – डॉ. नलिनी विखे, तालुका आरोग्य अधिकारी, राहुरी. .

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment