अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : बहुप्रतीक्षित नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्याला जोडणार्या भारतीय रेल्वे मार्गास केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे.
याकरिता लागणारी जमीन संपादन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली असून यासंदर्भात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले असून माहिती मागवली आहे.
या रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील गावांची यादी निश्चित करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एकूण 26 गावांचा समावेश या मार्गावरती होणार आहे.
कोळेवाडी 0.856 किमी, मारवाडी 2.005 किमी, बोटा 3.7 756 किमी, येलकोवाडी 2.2 किमी, अकलापूर 2.619 किमी, खंदरमाळ 2.129 किमी, नांदुर खंदरमाळ 2.798 किमी,
जांबूत 2.68 किमी, साकुर 5.806 किमी, बांबळेवाडी 3.5886 किमी, कुंभारवाडी 2.264 किमी, पिंपळगाव देपा 0.9 68 किमी, आंभोरे 3.616 किमी, कोळवाडी 2.4775 किमी, जाखोरी 2.405 किमी,
खराडी 1.2427 किमी, कोल्हेवाडी 2.139 किमी, वाघापुर 2.6 716 किमी, खानापूर 1.482 किमी, सुकेवाडी 1.47 किमी, घुलेवाडी 2.1179 किमी, मालदाड 1.623 किमी, गुंजाळवाडी 1.1244 किमी, वेल्हाळे
1.8 815 किमी, सायखिंडी 4.173 किलोमीटरक्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. या मार्गासाठी हवेली तालुक्यातील 11 गावे, खेड तालुक्यातील 18 गावे, आंबेगावमधील नऊ गावे,
जुन्नर तालुक्यातील दहा गावे, सिन्नर तालुक्यातील 17 गावे, नाशिक तालुक्यातील सहा गावे असा समावेश असणार आहे. सदरचे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या बाराशे दिवसात पूर्ण होणार आहेत. या मार्गावर धावणारी रेल्वे गाडी ताशी दोनशे ते अडीचशे किलोमीटर वेगाने धावू शकणार आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews