अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : प्रद्रीघ देशव्यापी संचारबंदीनंतर पंतपधान नरेंद मोदी आज रविवार 28 जून रोजी ‘मन की बात ‘ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चे आतापर्यंत 65 भाग प्रसारित झाले आहेत.
2020 वर्षातील ‘मन की बात ‘ चा हा सहावा आणि कोरोना संकटात चौथा भाग असणार आहे. ‘ मन की बात चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन , दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सर्व प्रदेशिक केंद्रांद्वारे पंतप्रधान कार्यालय ,
दूरदर्शनच्या सर्व यु – ट्यूब वाहिन्यांवर केले जाईल. त्यानंतर लगेच आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिन्या मन की बात चे हिंदी सोडून इतर भारतीय भाषांमध्ये प्रसारण करतील तसेच रात्री आठ वाजता या कार्यक्रमाचे पुनः प्रसारण होईल 31 मे रोजी मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले होते
.कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना माय गोव्ह आणि नमो अप्लिकेशन, 1800117800 क्रमांकाच्या माध्यमातून सूचना, अभिनव कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांबद्दल माहिती देण्याचे आवाहन ट्विटर द्वारे केले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews