लोणी गोळीबार व हत्या प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Ahmednagarlive24
Published:
लोणी : रविवारी लोणीत गोळी घालून तरुणाची हत्या करणाऱ्या व पसार झालेल्या सात पैकी पाच आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
पाचवा आरोपी शुभम कदम याला शुक्रवारी लोणी पोलिसांनी बाभळेश्वर येथून अटक केली. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
गेल्या १ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता राहाता तालुक्यातील लोणी बु. येथील हॉटेल साईछत्रपतीमध्ये श्रीरामपूर येथील फरदीन अबू कुरेशी या तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती.
या गुन्ह्यातील सातही आरोपी फरार झाले होते. पोलीस अधिक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, शिडींचे विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिलीप पवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा ठावठिकाणा शोधला.
शिरूर, जि. पुणे व येवला, जि. नाशिक येथून चार आरोपी जेरबंद करण्यात त्यांना यश आले होते. संतोष सुरेश कांबळे, सिराज आयुब शेख, शाहरूख शहा पठाण हे श्रीरामपूर येथील तर अरूण चौधरी हा लोणी येथील आरोपी गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात पकडले होते.
पाचवा आरोपी शुभम विजय कदम, रा. लोणी याला शुक्रवारी दुपारी लोणी पोलिसांनी बाभळेश्वर येथून अटक केली. त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.
लोणी गोळीबार व हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली असून दोघे जण अजूनही पसार आहेत.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment