महाराष्ट्र विधानसभेचे उद्या अधिवेशन; राज्यपालांकडून अधिसूचना जारी

मुंबई : राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174 अन्वये त्यांना प्रदान केलेले अधिकार वापरून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवार, दि. 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता विधान भवन, मुंबई येथे भरविण्याचे ठरविले आहे.

विधानसभेच्या या बैठकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी घेण्यात येणार आहे. यासंबंधीची अधिसूचना, आवाहनपत्र विधानसभेच्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आले आहे.

Latest News Updates

महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधान भवन, मुंबई येथे सकाळी 8.00 वाजता सुरु होईल. तरी विधानसभेच्या सर्व सदस्यांनी विधान भवन, मुंबई येथील अधिवेशनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याबाबतची अधिसूचना आज (मंगळवार, दिनांक 26 नोव्हेंबर, 2019) काढली आहे.