अहमदनगर : आज महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी शिवभोजन थाळीत गरजूंना फराळाचा आस्वाद घेता येणार आहे. एकादशी,चतुर्थी किंवा इतर दिवशी शिवभोजन थाळी योजने मध्ये उपवासासाठी काही थाळ्या राखीव ठेवणे शक्य नसले तरी महाशिवरात्री ला मात्र शिवभोजन थाळीत उपवासाचे पदार्थ मिळणार आहेत.
केंद्र चालकांमध्ये उपवासाच्या मेन्यू बद्दल सुरुवातीला संभ्रम होता. मात्र आता शासनस्तरावरून च सूचना आल्याने हा संभ्रम दूर झाला आहे. या मध्ये शेंगदाण्याची आमटी, राजगिऱ्याचा भात- चपाती, बटाट्याची भाजी या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.
महाशिवरात्रीनिमित्त शासनादेशाची पूर्ण दक्षता घेत जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने उचललेले पाऊल दिशादर्शक ठरणार आहे.
गरजूंची मागणी लक्षात घेता, शहरात मंजूर केलेल्या शिवभोजन थाळीत प्रशासनाने तीन केंद्रांवर 200 थाळ्यांची वाढ केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त देशभर निष्ठेने उपवास केला जातो.