गणेश चतुर्थीला ‘असे’ करा गणपती बाप्पाचे पूजन; पूर्ण होतील सर्व मनोकामना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- पौराणिक मान्यतांनुसार देवतांमध्ये प्रथम गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणपतीचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी झाला.

हा दिवस प्रत्येक वर्षी सनातन परंपरेत गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या वर्षी या उत्सवाचा सुरु होण्याचा मुहूर्त 21 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 11:02 पासून 22 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 07:57 पर्यंत आहे. हा पवित्र उत्सव 22 ऑगस्ट 2020 रोजी साजरा केला जाईल.

या दिवशी संपूर्ण देशात गणेशोत्सवास सुरुवात होईल.सनातन परंपरेतील कोणतेही काम गणपती बाप्पांच्या पूजनानेच सुरु होते. गणपतीची उपासना करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. भगवान गणपती गुणांची खाण आहे. आपण त्यांना फक्त हिरवी दुर्वांची पाने जरी

अर्पण केली तरी ते अगदी आनंदीत होतील आणि आपले सर्व अडथळे आलेली संकटे  दूर करतील. गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळताच अशक्य गोष्टी शक्य होतात. चला तर मग आज आपण गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची उपासना करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊया.

 गणपती पूजनाची पद्धत –

असे म्हटले आहे की,  गणपती बाप्पांचा जन्म दुपारी झाला. अशा प्रकारे 22 ऑगस्ट रोजी दुपारी गणेशाची पूजा करावी. गणेश चतुर्थीला सकाळी स्नान करून ध्यान करा आणि गणपती बाप्पांच्या व्रताचा संकल्प करा. यानंतर दुपारी गणपतीची मूर्ती किंवा त्याचे चित्र लाल कपड्यावर ठेवा. त्यानंतर गंगा पाणी किंवा शुद्ध पाणी शिंपडल्यानंतर

दोन्ही हात जोडून गणेशाची प्रार्थना करा आणि आपल्या पूजास्थळाला भेट देण्याची विनंती करा. त्यांची मंत्रोच्चार करुन पूजा करा आणि नंतर गणपतीच्या कपाळावर सिंदूर लावा. यानंतर गणपती बाप्पाला त्याच्या आवडत्या वस्तू म्हणजेच मोदक, लाडू, पुष्प, सिंदूर, 21 दुर्वा अर्पण करा. गणपती बाप्पांना दूर्वा अर्पण करताना खाली दिलेल्या मंत्रांचा जप करा-

‘ॐ गणाधिपताय नमः।’

‘ॐ विघ्ननाशाय नमः।’

‘ॐ ईशपुत्राय नमः।’

‘ॐ सर्वसिद्धाय नमः।’

‘ॐ एकदंताय नमः।’

‘ॐ कुमार गुरवे नमः।’

‘ॐ मूषक वाहनाय नमः।’

‘ॐ उमा पुत्राय नमः।’

‘ॐ विनायकाय नमः।’

‘ॐ इषक्त्राय नमः।’

प्रत्येक मंत्र म्हणून दोन दोन दुर्वा अर्पण करा. अशा प्रकारे एकूण वीस दुर्वा अर्पण होतील. यानंतर 21 व्या दुर्वेला पुन्हा एकदा हे सर्व मंत्र एकत्र म्हणा आणि त्यांना पूर्ण श्रद्धेने अर्पण करा. त्यानंतर श्रीगणेशाला 21 लाडू अर्पण करा. पूजन झाल्यावर बाप्पांच्या मूर्तीजवळ पाच लाडू ठेवा.

ब्राह्मणांना पाच लाडू अर्पण करा आणि बाकीचे आपल्या कुटुंबात प्रसाद म्हणून वाटून घ्या. जर तुम्हाला अधिक प्रसाद हवा असेल तर तुम्ही प्रसाद स्वरूपात जास्त लाडू वाटून स्वतंत्रपणे भगवंताला भोग अर्पण करू शकता. या पद्धतीने गणपतीची पूजा गणेश चतुर्थीला  केल्यास नक्कीच तुम्हाला गणपतीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment