अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या गळ्यावर व डोक्यात मारहाण करुन तिला ठार केल्याच्या आरोपीवरून पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कृष्णा जाधव यास अटक करण्यात आली.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कृष्णाचा कोंढवा (पुणे) येथील वर्षा हिच्याशी २७ डिसेंबर २०१९ रोजी विवाह झाला. ८ सप्टेंबरला वर्षाचा मृत्यू झाला.
याबाबत तिच्या माहेरचे नातेवाईक महेश जगन्नाथ ढवळे (कोंढवा) यांनी कृष्णाच्या विरोधात फिर्याद दिली. चारित्र्यावर संशय घेऊन वर्षाचा पतीकडून छळ केला जात होता.
पतीनेच तिच्या गळ्यावर व डोक्यावर कशानेतरी मारहाण करुन तिला जीवे ठार मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक मसूद खान यांनी तपास करुन कृष्णाच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved