अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे राहणारा आरोपी बाबासाहेब लक्ष्मण छत्रे याने त्याची पत्नी संगिता हिच्या मदतीने एका २७ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीवर त्याच्या शेतात इच्छेविरुद्ध बलात्कार केला.
तसेच यातील आरोपी बाबासाहेब छत्रे व त्याची पत्नी संगिता यांना दोन मुली आहेत. त्यांना मुलगा नाही. या कारणातून संगिता हिने नवरा बाबासाहेब याला पिडीत तरुणीशी मैत्रिण म्हणून फोनवर बोलत जा. तसेच संगिता हिने पिडीत महिलेलाही माझ्या पतीबरोबर मैत्रिण म्हणून बोलत जा,असे सांगितले.

एक दिवस शेतात मजूर बाया काम करत असताना सर्व बाया जाऊन दिल्या व पिडीत तरुणीला मुद्दाम पतीजवळ थांबविले. यावेळी खुना खाना करुन पत्नी संगिता निघून गेली. तेव्हा शेतात पिडीत विवाहित तरुणीवर बाबासाहेब छत्रे याने तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.
याप्रकाराने पिडीत तरुणीने फोनवर बोलणे आरोपीशी बंद केले. तेव्हा पुन्हा काही दिवसांनी संगिता हिने तू माझ्या नवऱ्याशी फोनवर का बोलत नाही? बोलणे बंद का केले? तू बोलत जा, तू बोलली नाहीतर मी फाशी घेवून मरेल व तुझ्या नावाची चिठ्ठी लिहील, अशी धमकी दिली.
तुझ्या आयुष्याचे वाटोळे करील अशी धमकी देवून तुला तुझ्या नवऱ्याने सांभाळले नाहीतर मी सांभाळीण, तू माझे ऐकले नाहीतर तुझ्या नवऱ्याला कीडनॅप करुन तुझ्या मुलींना मारुन टाकील, अशी धमकी दिली.
वरीलप्रमाणे पिडीत विवाहित तरुणीने श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी बाबासाहेब लक्ष्मण छत्रे व त्याची पत्नी संगिता दोघेरा लोणी व्यंकनाथ यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संगिता या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. फरार आरोपी बाबासाहेबचा पोलीस शोध घेत आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com