कुकडीचे हक्काचे पाणी न मिळाल्यास जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचे विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- आ. पाचपुते

Ahmednagarlive24
Published:
श्रीगोंदा :- श्रीगोंद्याच्या सिंचनासाठी हक्काचे सव्वा-दिड  टीएमसी पाणी मिळाले पाहिजे होते पण आत्तापर्यंत साडेसातशे ते आठशे एमसीएफटी पाणी मिळाले आहे अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येत असेल व  श्रीगोंदेकराना कुकडीचे हक्काचे पाणी मिळत नसेल तर  आपण विधानसभेत जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे.
त्याचबरोबर लॉकडाऊन चा कालावधी संपल्यानंतर  जर हक्काचे पाणी मिळाले नाही तर  आपण  हक्काच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन करणार आहोत सद्यस्थितीत पाणी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे अधिक-यांच्या हातून अजूनही वेळ  गेलेली नाही त्यामुळे अजूनही त्यांनी गांभीर्याने घेऊन श्रीगोंद्याला पाणी मिळवून दयावे ,लॉकडाऊन मुळे आम्हांला बाहेर पडता येत नाही आम्हांला ज्या मर्यादा आहेत त्याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये  अशी  माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.
श्रीगोंद्याचे सिंचन पूर्ण होण्यासाठी सव्वा ते दीड  टीएमसी पाण्याची आवश्यकता असते पण या आवर्तनातून श्रीगोंदा ला साडेसातशे ते आठशे एमसीएफटी  पाणी मिळाले आहे आमच्या हक्काचे आणखी 500 एमसीएफटी  पाणी मिळाले पाहिजे कालवा-सल्‍लागार समितीची बैठक कोरोणाच्या पार्श्वभूमीवर झाली नाही पण अधिकाऱ्यांनी ठरविले असते तर व्हिडिओ कॉन्फरन्स वर घेता आली असती.
पण कूकडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला शब्द दिला होता की श्रीगोंदा ला हक्काचे पाणी देवु पण पाणी कमी येतेय असे लक्षात आल्यावर आपण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या शी संपर्क केला असता त्यावेळी मंत्री महोदयांनी संबंधित अधिक-यांना तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले होते मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो पाठपुरावा केल्याचे दिसून येत नसल्यामुळे श्रीगोंदा वंचित राहत आहे. 
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाचे आम्ही पालन करीत असल्यामुळे आज श्रीगोंदेकराना जर हक्काचे पाणी मिळाले नाही तर  सध्याचा लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर  श्रीगोंद्याच्या हक्काच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन करणार आहोत ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येण्याची शक्यता आहे त्या जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हि पाणी न मिळाल्यास  विधानसभेत हक्कभंग आणणार आहे असेही ते म्हणाले.
कुकडी व घोड कार्यक्षेत्रात एकमेव विरोधी पक्षाचा मी एकटाच आमदार असल्याने याचा सत्ताधारी दुरुपयोग करतात असे मला वाट्याला लागल्याची खंत पाचपुते यांनी व्यक्त करून आणि जर असे असेल तर मी सद्याच्या विधानसभेमद्ये सर्वात जेष्ठ आमदार असून जर उद्या वेळ आली तर या पाणी प्रश्नाबाबत विधानसभेत हि याबाबत आवाज उठविणार आहे.तसेच आमदार कोणत्या पक्षाचा हे न पाहता शेतकरी केंद्र बिंदू मानून पाणी दिले पाहिजे उद्या पारनेर कराना हि पाणी मिळेल पण मध्ये आमचं श्रीगोंदेकराचं काय असा सवालही पाचपुते यांनी उपस्थित करून लॉकडाऊन नसते तर  श्रीगोंदेकरावर हि वेळ आलीही नसती असे हि पाचपुते म्हणाले. 
कर्जत-जामखेड  करमाळा ला आवर्तन जाताना मुबलक प्रमाणात पाणी जाते पण श्रीगोंद्याचे आवर्तन सुरू झाल्यावरच आवर्तनात अडचणीत येते दरवेळी श्रीगोंद्यातील शेती जाळण्याचे पाप अधिकारी करतात आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळाले च पाहिजे असे शेवटी पाचपुते म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment