आमदार बबनराव पाचपुते झाले आक्रमक म्हणाले राज्य सरकार ने शेतकऱ्याचा गळा….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-  राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करण्याऐवजी वीज मंडळाला १हजार कोटीची तरतूद करावी व शेतकरी वाचवावा असे प्रतिपादन आमदार बबनराव पाचपुते यांनी वीज वितरण च्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी बोलताना केले

महावितरणने महाराष्ट्रातील 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांना विजतोडीची नोटीस व तोंडी माहिती देण्यात आलेली असून विजतोडीचे काम महावितरणने चालू केले आहे.

वास्तवामध्ये महावितरण कडून अनेकांना अव्वाच्या-सव्वा बिले कोरोना काळामध्ये आलेली आहेत, अनेकांची बिले तर लाखोंच्या घरात आलेली आहेत तसेच तालुक्यात घोड विसापूर व कुकडीचे आवर्तन चालू आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

हा सावळा गोंधळ असताना 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या बोगस कारभारा निषेधार्थ शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी ११.०० वाजता श्रीगोंदा येथे भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयावर“हल्लाबोल व ठिय्या“ आंदोलन करण्यात आले

यावेळी बोलतांना आमदार बबनराव पाचपुते यांनी आघाडी सरकार चा तीव्र शब्दात निषेध केला राज्य सरकार ने शेतकऱ्याचा गळा घोटण्याच काम केले आहे वीज कनेक्शन तोडण्याऐवजी सरकारने वीज मंडळाला एक हजार कोटीची तरतूद करावी व शेतकरी वाचवावा कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना कोणत्याच पिकांना भाव मिळाला नाही तरीसुद्धा वारेमाप बिल आकारणी करणे चुकीचे आहे असे पाचपुते म्हणाले.

यावेळी भाजपा श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, बाळासाहेब महाडिक, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे नगरसेवक संतोष खेतमाळीस, बापूसाहेब गोरे ,अशोक खेंडके,संग्राम घोडके शहाजी खेतमाळीस नितीन नलगे ,माजी सभापती शहाजी हिरवे,पोपट खेतमाळीस दीपक शिंदे राजेंद्र उकांडे, जयश्री कोथिंबिरे दीपक हिरनावळे महेश क्षीरसागर ,आदी उपस्थित होते यावेळी वीजवितरण चे अधिकारी चौगुले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment