नेवासे :- राज्यात व देशातही काँग्रेसचीच सत्ता येईल. तसेच नगर जिल्ह्यातील कोणीही सध्या भाजपमध्ये जाण्याचे धाडस करणार नाही, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
आ.थोरात हे शेवगावकडे कार्यक्रमाला जात असताना तालुका अल्पसंख्याक आघाडीसह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने नेवासेत स्वागत करण्यात आले. तर भेंडा येथे ज्ञानेश्वर उद्योग समूहातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

आता काँग्रेसला नवी उभारी ….
या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, राज्यात व देशात काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याने आता काँग्रेसला नवी उभारी मिळत आहे. भेंडा येथे काँग्रेस नगर दक्षिणची जागा लढवणार का या प्रश्नाला बगल देत म्हणाले ते आम्ही ठरवू.
थोरात म्हणाले, आज काँग्रेसच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक युवा वर्ग काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याने काँग्रेसची ताकत वाढत आहे.