अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकटाच्या काळात मतदार संघातील जनतेबरोबरच, परराज्यातील लोकांनाही दिलासा देत मदत करण्याचे काम आपण केले आहे, करीत आहे.
मी माझे काम करतो त्यामुळे कोण काय बोलतोय या गोष्टीकडे आपण दुर्लक्षच करीत असल्याचे सांगतानाच घराणेशाहीवर टीका करत मला कुणी काही शिकवायची गरज नसल्याचे सांगत आमदार निलेश लंके यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता समाचार घेतला.
दरम्यान के.के.रेंजच्या प्रश्नावर कोणाला कितीही वल्गना करू द्या, मी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे, त्यांची गुंठाभरही जमीन आपण जाऊ देणार नाही. या प्रश्नासाठी वेळ प्रसंगी रणगाड्याखाली झोपण्याची देखील आपली तयारी असल्याचे आमदार यांनी स्पष्ट केले.
‘पारनेर दर्शन’ या न्यूजपोर्टलशी संवाद साधताना आमदार निलेश लंके म्हणाले की, कोरोनाच्या संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकी म्हणून आपण केलेल्या व करत असलेल्या कामाची माहिती जनतेला आहे. कर्जुले हर्या येथील कोव्हिड सेंटर हे राज्यातील सर्व सुविधा युक्त सुसज्ज असे सेंटर आहे.
या सेंटरमध्ये सतरा रुग्णांना मंगळवारी घरी सोडण्यात आले, त्यावेळी त्यांनी अजून काही दिवस आम्हाला येथेच राहू द्या, आम्ही तुम्हाला एक मत दिले तुम्ही आम्हाला जीवदान दिले, अशा शब्दात भावना व्यक्त केल्याचेही आमदार लंके यांनी सांगितले. त्यामुळे कोणाच्याही आरोपाला मी किंमत देत नाही.
के.के.रेंजच्या प्रश्नाविषयी बोलताना आमदार लंके म्हणाले की, याप्रश्नी कुणी कितीही वल्गना करू द्या, आपण जनतेच्या पाठीशी असून त्यांची गुंठाभरही जमीन जाऊ देणार नसल्याचे सांगत वेळप्रसंगी रणगाडयाखाली झोपण्याची देखील आपली तयारी असल्याचे आमदार लंके यांनी स्पष्ट केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved