आ. जगतापांच्या वाईनशॉपमध्ये राडा

Published on -

अहमदनगर – आमदार राहुल जगताप यांच्या फॅमिली मालकीच्या सावेडीतील प्रकाश  वाईनशॉपमध्ये हल्लेखोरी अंगलट आल्याने त्याला जेलवारी करावी लागली.

ही घटना काल रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आशीष रघुवीर गायकवाड या हरामखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,

त्याचे दोन जोडीदार मात्र पसार झाले. वाईनशॉपीचे मॅनेजर किशोर अशोक घेगडे (वय ३१, रा. शिरूर, पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार , सावेडीत मनमाड रस्त्यालगत आमदार राहुल जगताप यांच्या कुटुंबियांच्या मालकीचे वाईनशॉप आहे.

आशिष गायकवाड व त्याचे साथीदारानी दुकानातून दारूच्या बाटल्या घेतल्या, बाटल्या घेतल्यानंतर पैसे न ते निघाल्याने घेगडे यांनी त्यांना पैसे मागितले. 

आरोपींनी शिवीगाळ दमदाटी करून इथून पुढे, तुम्ही आठ दिवसाला हप्ता द्यायचा व दारू घेण्यासाठी माझे पंटर आले तर त्यांना उधार दारू द्यायची, जर नाही दिली तर पाहतो.

रस्त्याने चालायचे लायकीचा ठेवणार नाही, माझे विरुद्ध कम्प्लेंट दिली तर मी पाहून घेईन व इथून पुढे मला आठ दिवसात हप्ता नाही दिला

तर मी अशाच प्रकारे दुकानावर येऊन धिंगाणा घालीन’ अशी धमकी गायकवाडने दिली. साथीदारांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe