अहमदनगर :- बोधेगाव माझे काम करा, नाहीतर पाहून घेऊ असा दम कोणी देत असेल, तर काळजी करू नका, ते मी पाहतो.
दक्षिणेत इथला उमेदवार आवश्यक असताना बाहेरील उमेदवार का? मागील वेळी झालेल्या चुकांचा त्रास सर्वांनी भोगला.

यंदा तशी चूक न करता सेवेची संधी दिल्यास परिसरातील ३५ गावांचा विकास मी करेन, असे आश्वासन दिले.
जनसामान्यांसाठी माझे घर नेहमी उघडे राहील, अशी ग्वाही देत १९९१ ची पुनरावृत्ती करू, असा दावा नगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केला.
चापडगाव, बोधेगाव, बालम टाकळी येथे भेट देत आमदार जगताप यांनी मतदारांशी संवाद साधला. बोधेगाव येथील बन्नोमा दर्ग्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, राष्ट्रवादी युवकचे संजय कोळगे, काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, एकनाथ कसाळ यांच्यासह परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.