दोन युवकांना तरी नोकरी दिली का?

Published on -

पाथर्डी :- शेती आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात काहीच बोलत नाही.

फक्त कागदावरच कर्जमाफी, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख आदी फसव्या घोषणांची गाजरं दाखविण्याचे काम केले.

दोन कोटीऐवजी दोन युवकांना तरी या सरकारने नोकरी दिली का, किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, असा खोचक सवाल आमदार संग्राम जगताप यांनी केला.

भातकुडगाव, शहरटाकळी, भावीनिमगाव, घोटण, गदेवाडी, मुंगी, हातगाव, कांबी आदि गावांत सभा व प्रचार फेऱ्या झाल्या. यावेळी ते बोलत होते.

ज्या भाजपसाठी आम्ही तन-मन-धनाने काम केले, त्या भाजपने शेवगाव तालुक्याचे वाटोळे केले. साडेचार वर्षांच्या सत्तेत तालुक्याचे लोकप्रतिनिधींचे कुठलेच ठोस विकासकाम नाही.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या आणि जनशक्ती मंचच्या नेत्या हर्षदा काकडे यांनी केले. काकडे यांनी जगताप यांच्या प्रचारात सहभाग घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe