अहमदनगर :- माझ्यावर राजकीय द्वेषातून काही लोक आरोप करत आहेत. काही आमदारकीचे स्वप्नच पहात आहेत, तर काही लोक आपण आमदारकीला पडलो आहोत हे मान्य करायला तयारच नाहीत.
अशा सर्व लोकांना मी वेळोवेळी त्यांची जागा दाखवून दिली आहे, असा टोला प्रा. गाडे, माजी आमदार राठोड, तनपुरे यांचे नाव न घेता आमदार शिवाजी कर्डिले यांनी लगावला.

नगर येथे भाजपच्या वतीने विखे यांच्या प्रचारार्थ साई आनंद येथील मेळाव्यात ते बोलत होते.
आमदार कर्डिले म्हणाले, दक्षिणेची उमेदवारी डॉ. विखेंना मिळाल्याने आम्हा सर्वांना आनंद झाला. परंतु, राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिल्याने सर्वजण संभ्रामात पडले.
की आता कर्डिले कोणाचे काम करणार. कार्यकर्त्यांना काय आदेश देणार. माझ्यासोर धर्मसंकट उभे नाही. माझी भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही.