अहमदनगर :- अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन करणारा सतीश रमाकांत ढाळे (वय 54) याला जिल्हा न्यायालयाने दोषी धरत तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडाच्या रकमेपैकी चार हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा आदेश दिला आहे.

पोलीस उपनिरीक्षक देवडकर यांनी गुन्ह्याचा तपास केला. सरकारी वकील ऍड. व्ही. के. भोर्डे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.