अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : खासदार डॉ. सुजय विखे हे वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. त्यांना महापालिकेतील गोष्टींविषयी त्यावेळी नाॅलेज नव्हते. खासदार डॉ. विखे व भाजप नगरसेवकांची दोन-तीन वेळा बैठक घेण्यात आली.
यात त्यांना महापालिकेतील समस्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी महापालिकेतील समस्यांवर एक दीर्घ बैठकही घेतली होती, असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीनिमित्त केलेल्या कामकाजाची माहिती देण्यासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांच्यासह महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी पत्रकारांशी मंगळवारी संवाद साधला.
खासदारांनी भाजप नगरसेवक व प्रशासन काही सांगत नसल्याबाबत व्यक्त केलेली खंत याबाबत पत्रकारांनी विचारले असता, गंधे म्हणाले, शंभर टक्के समन्वय आहे, पण त्या कालावधीत खासदारांना पालिकेविषयी फारसे नाॅलेज नव्हते.
आमच्यात कोणताही दुरावा नव्हता, त्यांना महापालिकेचे काही विषय समजून घ्यायचे होते. निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांचा कार्यकाळ वेगवेगळे जीआर मतदारसंघाची माहिती घेण्यात गेला.
त्यानंतर आम्ही मनपाच्या माध्यमातून खासदारांच्या उपस्थितीत संयुक्त बैठका घेतल्या. सविस्तर माहिती घेतली. आमच्यात कधीही दुरावा नव्हता, त्यांनी महापालिकेचे काही विषय समजून घेतले.
त्यांनी इतर शासकीय खात्यांविषयीच्या अडचणी जाणून घेऊन सोडवून दिल्या. पण त्यावेळी त्यांना केवळ नगर महापालिकेबद्दल जास्त माहीत नव्हते, असे गंधे यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews