श्री मार्कंडेय जयंती उत्साहात साजरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर:  श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिरात श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने भव्य महाप्रसाद (भंडारा) चे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचे 4000 भाविकांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने आगडगाव येथील मिष्ठान्न भोजन करण्यात आले. यामध्ये भाकर, आमटी, भात, लापशी असे पदार्थ ठेवण्यात आले होते. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

     श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त देवस्थानच्यावतीने सकाळ पासुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 7 वाजता ऋद्राभिषेक, स.8 वा.होमहवन, सकाळी 10 वा.सत्यनारायण महापुजा, स.11 वा.आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

     प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या 9 वर्षापासून मार्कंडेय जयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात  येत आहे. तसेच वर्षभरात विविध सामाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान शिबीर, नेत्रतपासणी शिबीर, वृक्षरोपण कार्यक्रम, महाआरती उपक्रम, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम प्रतिष्ठाणच्या वतीने घेण्यात येतात, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै.शुभम सुंकी यांनी सांगितले.

     जयंती उत्सवा यशस्वीकरण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर मंगलारप, अमोल बोल्ली, अजय लयचेट्टी, शुभम सुंकी, अमित गाली, विशाल कोडम, अमित सुंकी, योगेश न्यालपेल्ली, प्रविण सुंकी, प्रणव बोज्जा, राकेश गाली, शंकर जिंदम, बापू खडसे, किशोर शिंदे, सुनिल कोडम, यशवंत सुंकी, विजय कोडम, विनायक सोन्नीस आदिंसह सर्व पदाधिकारी व प्रतिष्ठानचे सदस्यांनी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment