अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील कोरोना रुग्णांसाठी महापालिकेने आतापर्यंत २ कोटी ६४ लाख रुपये खर्च केले आहेत. हा आकडा मागील अहवालातील असून त्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५३ हजारांवर पोहोचली आहे. नगर शहरातही हा आकडा कमालीचा वाढला होता. सरकारने सुरुवातीला काही निधी दिला. त्यानंतर १४व्या वित्त आयोगातून खर्च करण्यात आला.
केवळ तपासणीवरच आतापर्यंत एक कोटी दहा लाखांचा खर्च झाला आहे. अहवालानुसार दोन कोटी ६४ लाख खर्च झाला आहे, असे आयुक्त मायकलवार यांनी स्पष्ट केले.
ज्या रुग्णालयांनी शासकीय दरांपेक्षा जास्त बिल रुग्णांना आकारले आहेत, त्या रुग्णालयांनी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यावर पैसे जमा करून अहवाल सादर करण्याचे मनपाने आदेश दिले आहेत.
जर रुग्णांच्या खात्यावर जास्तीची रक्कम जमा केली नाही, तर संबंधित रुग्णालयांची नावे आम्ही जाहीर करू, असे मायकलवार म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved