कोपरगाव :- तालुक्यातील खोपडी येथील आरती श्यामहरी त्रिभुवन (२२) या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे.
तिचा भाऊ गणेश आनंद पठारे याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरतीचा पती श्यामहरी, दीर शिवहरी व रामहरी, सासरा चांगदेव व सासू अंजनाबाई यांच्याविरुद्ध हुंड्याची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरतीचा घातपात झाला असून आरोपींना अटक करण्याची मागणी माहेरच्यांनी केली होती. ३० एप्रिल २०१८ ते १४ जानेवारी २०१९ या कालावधीत वारंवार हुंड्याची मागणी करून
आरतीचा शारीरिक व मानसिक छळ केला गेला. शिवीगाळ व दमदाटी करून तिला विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.