अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : सौंदाळे येथील अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी अप्पासाहेब नानासाहेब थोरात यास नेवासे येथील जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली.
खुनाच्या कारणाचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे. वैष्णवी सोमनाथ आरगडे (वय ९) या मुलीचा रविवारी झोपेत असताना खून झाला. सर्पदंशाने ती मरण पावल्याचे सांगितले जात होते.
पोस्टमार्टेमनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. चौकशीत अप्पासाहेब नानासाहेब थोरात (वय २२, आपेगाव, ता. पैठण) या मुलीच्या आतेभावाने वैष्णवीचा खून केल्याची कबुली दिली.
आरोपीस २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. आरोपी आरगडे यांचा भाचा आहे. तो भेंडे येथे आयटीआय शिक्षणासाठी आरगडे यांच्याकडे राहत होता.
वैष्णवीचा खून कोणत्या कारणाने झाला, हे गूढ कायम आहे. आरोपी अप्पासाहेब हा घटना घडली त्या रात्री मोबाइलवरुन पहाटेपर्यंत कोणाशी चॅटींग करत होता? त्याचा मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews