सोलापूर : माळशिरस येथे एका तरुणाचा गळा आवळून खून झाल्याची घटना दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री घडली असून योगेश औदुंबर गुरव (वय २३, रा.माळशिरस) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत माळशिरस पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत तीन ते चार जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
योगेश हा १० नोव्हेंबर रोजी बाजारतळ येथील आपल्या घरातून सव्वाआठच्या सुमारास बाहेरून जेवण करून येतो, म्हणून घरातून गेला होता. दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तारेने गळा आवळल्याच्या अवस्थेत पाटबंधारे विभाग येथील डाक बंगल्याच्या आवारात आढळून आला.
याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याची ओळख पटवून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.