भररस्त्यावर तरुणावर चाकूने वार

Published on -

नगर: नगर शहरात तोफखाना परिसरात शितळादेवीच्या मंदिराजवळून दीपद देवानंद ताडला, वय १९ रा. दातरंगे मळा, नालेगाव, नगर हा तरुण दुचाकीवरुन जात होता.

आरोपी मोहीत परदेशी याने दीपक ताडला या तरुणाच्या दुचाकीची चावी काढून घेतली व शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली.

धारदार चाकूने मोहीत परदेशीने दीपक या तरुणावर वार करून हातावर, पोटावर जखमी केले.

गंभीर जखमी दीपक ताडला या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी जखमी दीपकच्या फिर्यादीवरुन आरोपी मोहीत परदेशी याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

११ च्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झाला. पोसई घायवट हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने तोफखाना परिसरात खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe