अहमदनगर :- पंधरा दिवसांपूर्वीच तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् त्या दोघांची गृहस्थाश्रम वाटचाल सुरू झाली. दोघांच्या सुखी संसारात जुना मित्र प्रकटला.
त्याने तिच्या मिस्टरांकडे दहा लाखांची खंडणी मागत त्याने संसाराच्या वाटेत काटे टाकले. आता हा वाद थेट पोलिसांच्या दारात पोहोचला असून पोलिस त्या ‘मित्राच्या शोधात आहेत.
कोण्या पिक्चरमधील ही कहाणी नाही तर ही नगरात घडलेली वास्तव घटना. रितेश सुधाकर शिंदे (रा. हल्ली दुबई) असे आरोपीचे नाव आहे.
रितेश शिंदे आणि ‘ती’ एकाच उपनगरात राहणारे. शिक्षणाचे धडेही दोघांनी एकाच ठिकाणी गिरविले. दोघांमधील ओळखीचं रुपांतर पुढं मैत्रीत झाले. मैत्रीत फोटोशूट झालं अन् त्याने तो ‘अनमोल ठेवा’ जतन करून ठेवला.
गेल्या महिन्यातच तिचं लग्न झालं. ही बाब त्याला समजली. त्याने तिच्या पतीच्या अन् मित्रांच्या व्हॉटसअॅपवर तो जुना ‘अनमोल ठेवा’ शेअर करत तिची बदनामी केली.
इतकंच काय तर त्याने आणखी बदनामीची धमकी देत तिच्या मिस्टरांकडे दहा लाखांची खंडणीही मागितली.
आरोपीने तरुणीचा पती व त्याच्या मित्रांच्या मोबाइलवर फोटो टाकून तिच्या पतीकडून दहा लाखांची खंडणी मागितली.
कायनेटिक चौक व केडगाव उपनगरात २८ डिसेंबर २०१८ ते १ जुलै २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला.
तरुणीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी रितेश सुधाकर शिंदे (शास्त्रीनगर, केडगाव, हल्ली दुबई) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.
केडगावातील या तरुणीची ११ वीत शिकत असताना रितेशशी ओळख झाली. काही दिवसांतच ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.
रितेशने त्यांच्या भेटीचे फोटो काढले. डिसेंबर २०१८ मध्ये रितेशने या तरुणीला कायनेटिक चौकातील लॉजवर नेत शरीरसुखाची मागणी केली.
तिने नकार देताच त्याने जबरदस्ती केली. हा प्रकार तिने घरच्यांना सांगितला. बदनामी नको म्हणून घरच्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
मात्र, रितेशने फोटो दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. दरम्यान, जून २०१९ मध्ये संबंधित तरुणीचे नगर तालुक्यातील एका तरुणाशी लग्न झाले.
आरोपीने तिच्या पतीचा मोबाइल नंबर मिळवून त्याच्यावर तरुणीचे फोटो टाकले. मला दहा लाख रुपये द्या, नाहीतर सोशल मीडियावर बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली.
त्यानंतर पतीच्या मित्रांच्या मोबाइलवर फोटो टाकून तरुणीची बदनामी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली.
मी दुबईला असलो, तरी माझे केडगावचे मित्र तुमच्याकडे पाहून घेतील, अशा धमक्या त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
- कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना कशाचीही कमतरता नसते ! त्यांच्या कुंडलीत असतात करोडपती बनण्याचे योग
- ओप्पोचा धमाकेदार फोन भारतामध्ये लॉन्च! मिळेल सोनी IMX890 सेन्सरसह 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि बरेच काही
- कर बचतीकरिता गुंतवणूक पर्याय शोधत आहात? ‘या’ ठिकाणी कराल गुंतवणूक तर होईल लाखोंची बचत
- सिबिल स्कोर उत्तम ठेवायचा तर ‘या’ 5 गोष्टी पाळा! सगळ्याच गोष्टीत होईल फायदा
- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न