नगर – पुणे महामार्गावर स्वस्तिक चौक परिसरात असलेल्या ब्लू डायमंड मसाज सेंटरवर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला.
शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या मसाज सेंटरवर छापा टाकून एका महिला व पुरुषाला ताब्यात घेतले.
या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक मिटके यांना मिळाली होती.
त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. पोलिसांना मसाज सेंटरमध्ये एका महिलेसह पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत आढळले.
दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिस उपअधीक्षक मिटके यांनी सांगितले.
- बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात लवकरच होणार शिक्षकांची मेगाभरती, किती हजार पदे भरली जाणार ?
- …….तर पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांचे अकाउंट बंद केले जाणार ! पैसे सुद्धा काढता येणार नाहीत
- Post Office च्या 5 वर्षांच्या एफडी योजनेत 11,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- आधारचे किती प्रकार आहेत? UIDAI कडून मिळतात ‘हे’ 4 फॉरमॅट, कुठे कोणता वापरायचा ते जाणून घ्या!
- निसर्गाची बहुगुणी भेट!’हे’ एकच फळ आरोग्य, सौंदर्य आणि अगदी इंधनासाठीही ठरते उपयुक्त