मुस्लिम समाजबांधवांचा पुरग्रस्तांना मदतीचा हात

Published on -

अहमदनगर :- कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु असताना, चांदा (ता. नेवासा) येथील मुस्लिम समाजबांधवांनी बकरी ईदनिमित्त जमा केलेली मदत मंगळवारी पाठवली.

चांदा येथील मुस्लिम समाज बांधवांनी ईद साध्या पध्दतीने साजरी करीत सामाजिक बांधिलकी जपत पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. ईदच्या नमाजनंतर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गावातून मदतफेरी काढण्यात आली होती.

यावेळी मुस्लिम बांधवांसह नागरिकांना सढळ हाताने मदत केली. अन्न-धान्यासह जीवनावश्यक वस्तूंची जमा करण्यात आलेली मदत ट्रकद्वारे पाठविण्यात आली आहे.

मदत संकलन करण्यासाठी शकील कुरेशी, बशीर मेंबर कुरेशी, सादिक कुरेशी, शब्बीर तांबोली, रफिकभाई मिस्तरी, समीर तांबोली, हामिद मुलानी, अस्लम कुरेशी, भैय्या शेख, डॉ.सुहेल शेख आदी गावातील मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले.  

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe