नगर मध्ये आरपीआय सेनेच्या अनिल राठोड यांच्या सोबत

Published on -

नगर :  महायुतीतील भाजप व शिवसेना पक्षाच्या नगर जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रचार करून आयपीआय युतीचा धर्म पाळणार आहे, अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशानुसार आरपीआय पक्ष युतीचा धर्म पाळणार असून नगर जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराचाच प्रचार आम्ही करणार आहेत. पक्षातील काही नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर केली जाईल. असे सुनिल साळवे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

परंतु निवडणूक कोणी लढवायची तो निर्णय पक्षाचे अध्यक्ष आठवले हे घेतात. त्यामुळे आम्ही नगर जिल्ह्यात युतीचा धर्म पाळणार आहोत, असे ते म्हणाले. यावेळी विनोद भांबळ, भाऊसाहेब साळवे, जितू ठोंबे, शिवाजी साळवे, सचिन साळवे, गायकवाड आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe