नगर- दौंड रोडवर बर्निंग कारचा थरार

Ahmednagarlive24
Published:
श्रीगोंदे – दि.1 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता दौंड कडून नगरकडे जाणार्‍या फोर्ड कंपनीच्या कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. 
या घटनेत कोणतीही जीवित हानी नाही. मात्र लाख मोलाची कार जळली असताना याबाबात साधी खबर देखील बेलवंडी पोलिसात स्टेशनला दिली नसल्याने घटने बाबत संशय वाढला आहे.
नगर-दौंड रस्त्याचे काम झाले आहे. मात्र अनेक वेळा या रस्त्यावर अपघात घडत आहेत. अशा घटनाची खबर तातडीने संबधीत हद्दीतील पोलिसात दिली जाते. सदर घटना घडल्या नंतर कार मधील प्रवासी अथवा कारचा ड्रायव्हर यांच्यापैकी कोणीही पोलिसात तक्रार दाखल न करता निघून गेल्याने शंका उत्पन्न होत आहे.
या घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. या गाडीत नेमके किती जण होते आणि गाडी पेटल्यानंतर गाडी सोडून गेलेले व्यक्ती बाबत माहिती पोलीस स्टेशनला उपलब्ध नव्हती किंवा प्रत्यक्षदर्शीना देखील अधिक माहिती नव्हती.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment