आईचे दागिन्यांसह दोन लाख चाेरून तरुणी प्रियकरासोबत पळाली !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर भागात रहाणाऱ्या आईचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज चोरून तरुणी प्रियकरासोबत फरार झाली आहे.

याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगी व तिचा प्रियकर सागर गणेश शिंदे याच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घराशेजारीच राहणाऱ्या सागर शिंदे याच्या प्रेमात पडलेली तरुणी काही दिवसांपूर्वीच त्याच्याबरोबर पळून गेली होती.

परंतु खर्चाच्या टंचाईमुळे हे दोघे तीन-चार दिवसांत पुन्हा घरी परतले. ही घटना घडून महिना उलटत तोच दोघे पुन्हा फरार झाले.

घरातील दागिन्यांसह पैसे चोरून फरार !

१४ जानेवारीला दोघेही फरार झाल्याचे त्यांच्या कुटुंबाच्या लक्षात आले. मुलीने जाताना तिच्या आईचे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व एक लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून सागर याच्यासह पोबारा केला.

दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल.

चार-पाच दिवस सर्वत्र शोध घेऊनही मुलीचा तपास लागला नाही. त्यामुळे तिच्या आईने कोतवाली पोलिस ठाणे गाठत मुलगी व तिचा प्रियकर सागर याच्या विरोधात फिर्याद दिली. दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment