नगर – नगर परिसरात वडगाव ते पिंपळगाव माळवी, शेंडी बायपास रस्त्यावर काल ९.३० च्या सुमारास स्पीडब्रेकरजवळ भांडण चालू होते.
ट्रक चालकाला पल्सरवरील आरोपी मारहाण करीत होते. तेव्हा भांडण पाहून थांबलेले शिवनाथ संपत शेवाळे, वय ३२ रा. वडगाव गुप्ता या तरुणाने तुम्ही ट्रक ड्रायव्हरला का मारता?
असा प्रश्न केला तेव्हा आरोपींना राग येवून त्यांनी धारदार शस्राने डोक्यात वार करुन शेवाळे यांना जखमी केले. त्यांचा आवाज ऐकुन भाऊ युवराज तेथे आला तेव्हा तिघे आरोपी व ट्रक घटनास्थळावरुन निघून गेले.
जखमी शिवनाथ संपत शेवाळे या तरुणाने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन पल्सरवरील तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.